आली आली आली आली, बायकांची ही मंगळागौर
नववधूचा श्रावण पहिला, सणाची या मजाच काही और
बायकांनीच सण आयोजिला, सर्वत्र स्त्रीशक्तीचाच सूर
झिम्मा-फुगडी घालायला, सर्वजणी येथे हजर जरूर
पूजा-आरती-जेवण सोडल्यास, पुरुषांना त्या ठेवतात दूर
रात्री जागरण-धुडगूस घालतात, जोर यांना असे भरपूर
मनोरंजनाचे खेळ करी, उत्साहाला देखील येई पूर
आली आली आली आली, बायकांची अशी ही मंगळागौर