माझ्या रखरखत्या उन्हात तुझ्या चांदण्याची शिंपन,
माझ्या विस्कटलेल्या काट्याकुट्यांना तुझ्या फुलांचे कुंपन;
वाटेवरल्या काचांनी रक्तारळलेले पाय अन रक्ताळलेले मन,
तरीही मला सुखावते तुझ्या हसण्याने सरावलेले माझे आंगण;
उजाड, रित्या डोळ्यांना तुझ्या स्वप्नांचे कोंदण,
कसे दाखवू तुला हृदयावर तुझ्या नावाचे गोंदण;
कळेल का तुझे तुलाच, जेव्हा भेट करेन
माझ्या प्राणांचे आंदण...