भ्रमिष्ट

रोजचच झालय तुझ,

गर्दीमध्ये असूनपण स्वतःमधे नसन,

काही कारण नसतांना उगीचच हसण...

फिरत राहतोस स्वतःच्या आकाशात,

मग दिसतही नाहीस जगाच्या नकाशात;

लोकांमधे हे वागण दिसत नाही बर,

हसतात तुझे मित्र

म्हणतात, "आता ह्याच नाही काही खर..."