स्वागत

स्वागत

स्वागत असो तुझे चिमुकल्या
आपुल्या घरात तुझे तान्हुल्या
ऐकण्यास तुझा हुंकार आसुसले कान
एकताच शब्द 'बाबा' विसरेन भान
स्पंदनाने तुझ्या हालतील पाने
शब्दांनी तुझ्या झुलतील मने
गातिल चिउकाउ तुजसाठी अंगाई
रविकिरणे घालतील उबदार दुलई
हसशील तू जेव्हां उजळेल आसमंत
चंद्रसुर्याला वाटेल आपुल्या तेजाची खंत