अजरामर
जगाच्या पाठीवर असेही काही हिरे असतात.
की ज्यांना कधी नशिबाची साथ मिळाली नसते;
म्हणून ते जगंन सोडून देत नसतात.
आपल्या हातानां तरवारी सारखी धार देत असतात.
दुखाःशी , संकटाशी , आव्हानांशी लढण्यासाठी.
आव्हान स्वीकारतानीं ते इतके कठोर बनून जातात;
की संकटे जरी आले तरी हसत हसत सामना करतात.
फुलांसोबत खेळतांना ते कोमल होवून जातात.
काटेरी वळण लागल की ते वेग आणखी वाढवतात.
आयुष्यात काही मिळाल नाही म्हणून शोक करत नसतात.
भुतकाळात जाऊन ते विचार करित नसतात.
स्वतःच्या युक्तीने ते काहीतरी नवीन घडवत असतात.
असेच लोकं कधीतरी अजरामर होऊन जातात.
आणि जग त्यांना महापुरुष म्हणून संबोधतात.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)