ही दुनिया.....

ही दुनिया.....

जगण्यासाठी येथे खुप वाव आहे.
मरणाऱ्यांची पण येथे काही कमी नाही.
ही दुनिया निराळीच आहे.

येथे केल्या जातात गरीबांच्या आयुष्याची होळी.
श्रिंमतांना झोप लागत नाही म्हणून घेतात झोपेची गोळी.

जगण्यासाठी येथे खुप काही आहे;
पण जगणारेच येथे मिळत नाही.
आशेच्या पाण्यावर पोहणारे खुप मिळतात;
पण स्वबळावर एखादा लढणारा मिळने कठिन आहे.
ही दुनिया निराळीच आहे.

येथे पैसा आहे; पण काम नाही.
आणि जेथे पैसा आहे तेथे राम नाही.

येथे जात आहे; धर्म आहे; भाषा आहे; पथं आहे.
तरी पण आपण एकरुप आहोत.
ही दुनिया निराळीच आहे.

या निराळ्या दुनियेत सगळं काही आहे.
सुख, लोभ, क्रोध, गर्व , अहंकार आहे;
म्हणून येथे जीवन जगंन कठिन आहे.

माणसाने स्वतःच्या कर्तुत्वाने खुप प्रगती केली आहे.
ही दुनिया खुप जवळ आली आहे.
पण  मनं दुरावली आहे.
ही दुनिया निराळीच आहे.

दुसऱ्यासाठी तर सोडा;
स्वतःसाठी पण येथे वेळ मिळत नाही.
जगणारे  येथे आपणच आहोत.
मरणारे पण आपणच आहोत.
खरच ही दुनिया निराळीच आहे.
            जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)