डिंगरी-दो-प्याझा

  • डिंगरी (मश्रुम्स) - उभे दोन भाग करून - दोन वाट्या
  • छोटे कांदे (पातिच्या कांद्याचे) - ८-१०
  • मोठा कांदा - बारिक चिरून - १/२ वाटी
  • तिखट, मीठ, गरम मसाला - चवी प्रमाणे
  • कसोरी मेथी - चुरडून - १ मोठा चमचा
  • कलोंजी (कांद्याचे बी - दुकानात याच नावाने मिळते) - एक चमचा
  • जीरे - एक चमचा
  • तेल - दोन मोठे चमचे
  • दही - फेटलेले - एक वाटी
  • कोथिंबीर - बारिक चिरून - थोडी / जास्त हवी तशी!
३० मिनिटे
चार जणांसाठी

तेल गरम करून त्यात जिरे व कलोंजी घालून जिरे तडतडू द्यावे,

बारिक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होइपर्यंत परतणे, हळद घालावी

छोटे कांदे घालून ते परतून घेणे

मश्रुम्स घालून परतून घेणे, दोन मिनिटे झाकण ठेवणे

आता चविप्रमाणे मीठ, तिखट, गरम मसाला घालून ढवळणे, कसोरी मेथी भुरभुरवणे.

फेटलेले दही सर्वत्र लागेल असे पसरून ढवळणे

गॅस बंद करून झाकण ठेवणे. दोन मिनिटांनि कोथिंबिर पेरून खायला घावे.

गरमा गरम फुलके किंवा पोळी बरोबर मस्त लागेल.

आवडत असल्यास तेला ऐवजी बटर घालून हा पदार्थ केल्यास झकास!

एक मित्र