तुझी आठवण

तुझी आठवण

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मी थांबत होतो.

तुझ्या आठवणिंना सोबत
घेऊन चालत होतो.

प्तत्येक वळणावर मी थांबून स्वतःलाच
स्वःता धिर देत होतो.

मनात माझ्या फक्त
तुझेच विचार होते.

त्या विचांराना सोबत घेऊन
मी जगत होतो.

दुःख काय असत याचा अंदाज
मला तु गेल्यावर आला.

तरीपण मिळालेल्या दुःखानां
मी प्राषण करीत होतो.

पायात काटा रुतावा आणि
तो सलत जावा.

तुझ्याबरोबर घालविलेले क्षण
मला सारखे सलत होते.

तरीपण त्या क्षणांची जखम
सोबत घेऊन मी जगत होतो.

वाटंल आयुष्याच्या या वळणावर
तु परत मला कधीतरी मिळशील;

म्हणून कावराबावरा होऊन
 जग ढुडंत होतो.

तुलापण कधीतरी माझी आठवण येईल
या एकाच आशेवर आयुष्याचा महासागर पोहत होतो.

                     जितेंद्र गावंडे
(९९२२४७६२५०)