कोण जाणे..........

कोण जाणे........

कोण जाणे आयुष्यात काय घडावे.
रात्रिच्या स्वप्नात माझेच प्ततिबिंब मला दिसावे.

कोण जाणे एके दिवशी आयुष्यात काय घडावे.
पक्ष्याप्रमाणे आपला जीव हवेत उडून जावे.

कोण जाणे आमच्या नशिबी काय असावे.
दुःखाचे डोगंर आम्हालाच का मिळावे.

कोण जाणे या जगी फक्त आम्हीच पाप केले असावे.
म्हणुनच का आमच्या नशिबी दुःख आले असावे.

कोण जाणे आमच्या आयुष्यात काय लिहिले असावे.
आम्ही प्रेम करावे ; त्यांनी आम्हा दुःख द्वावे.

कोण जाणे आयुष्यात काय घडावे.
असेच आमचे आयुष्य दुःखामध्ये संपून जावे.

कोण जाणे आयुष्यात काय घडावे.
आम्हीच का पाणी समजून विष प्राषण करावे.

कोण जाणे आयुष्यात काय घडावे.
फक्त आम्हीच का सुखासाठी झगडावे.

कोण जाणे आयुष्यात एके दिवशी काय घडावे.
दुःखानंतर आम्हालाही सुख मिळावे.

                              जितेंद्र गावंडे ( ९९२२४७६२५०)