लाल भोपळ्याची खीर

  • लाल भोपळा तुकडे १ वाटी
  • ४ वाटी दूध
  • ८ ते ९ च्म्चे साखर
  • १ चमचा साजुक तुप
  • वेलची - जयफळ पूड
  • काजू बदाम बारिक कापून
  • १ चमचा बारिक रवा
२० मिनिटे
४ जण
  1. प्रथम भोप्ळ्याचे तुकडे करून मऊ वाफवून आणि चम्च्याने घोटून घ्यां, प्रथम एका भाण्ड्यात १ चम्चआ तुपावर रवा परतुन घ्या. त्यानंतर भोप्ळ्याची पेस्ट हलकेच परता‍‍, मग त्यात उकळलेले दूध घालून उकळी आणा. मग साखर आणि वेलची- जायफळ पुड मिक्स करून ऊकळी आणा , शेवटी सुकामेवा घालून सजवा. थोडी दाटच  छान लागते.

हि खिर गरम अथवा थंड हि चांग्ली लागते. रंग सुरेख येतो आणि हेल्दी आहे.आणि सोपी आहे.

प्रयत्न पहिलाच आहे लिहायचा, समजून घ्यावे.

आई