पिले खेकड्यांची

पिले खेकड्यांची, रेतीत सोडती का ठसा आपला?
पिले माणसांची, मातीत गाडती का वसा आपला?

न संपेल साठा, केंव्हाच आपल्या ह्या तलावातला
पिले बेडकांची, ऊगाच फाडती का घसा आपला?

हमाली करोनी, वायाच चालला जन्म माझा असा
पिले गाढवांची, लाथाडती  कसा भारसा आपला?

जरी कवडसेही, ना भेटतीच भावासही सर्वदा
पिले भास्कराची, स्वार्थास मानती वारसा आपला

धुवावेच ताटाला, स्वच्छ चेहरा तो दिसे आपला
पिले काळज्यांची, ऊगाच व्यापती आरसा आपला
...................

कसा भूत होताना वर्तमान तो ढासळे आतला
लढाया भविष्याशी देह सांडती का असा आपला?