मी सिंधुताई सपकाळ

महिला सबलीकरणाची सध्या राजकारणात जोरदार चर्चा रंगलीये.महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत झालं. लोकसभेतही होईल म्हणा संपुर्णपणे महिलांनी बनवलेला जागतिक मराठी सिनेमा ' संहिता' लवकरच येणार आहे. यंदाचा सर्वोकृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर पुरस्कार पण कॅथ्रेन बिगेलो या एका महिलेला मिळाला. खरंच स्त्री पुढे जातेय, प्रत्येक क्षेत्रात...

पण तिचा संघर्ष सोपा सुटसुटीत कधीच नसतो. समाज घराबाहेर पडलेल्या प्रत्येक स्त्रीचं स्वागत तिरस्काराच्या नजरेनेच करतो. पण काही महिला असं काही कर्तृत्व दाखवतात, की समाजानं ' बाईमाणूस' म्हणून दुर्लक्षित केलेली  हीच महिला ' देवमाणूस' बनून जाते. अशीच एक समाजसेवी महिला म्हणजे सिंधुताई सपकाळ. हे नाव उच्चारलं की जिद्द म्हणजे काय ते कळतं. हे नाव उच्चारलं की अंधारलेल्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. डबडबलेल्या डोळ्यांमध्ये आशेचा दिप निर्माण होतो. अनेक अनाथाना हक्काचे  घर आणि मायेचं माहेर देणाऱ्या सिंधुताईचे उभं आयुष्य म्हणजे एक जबरदस्त नाट्य असलेली पटकथा आहे. सिंधुताईचं आयुष्य म्हणजे एक जबरदस्त नाट्य असलेली  पटकथा आहे.

सिंधुताईचं आयुष्य म्हणजे एक झंझावातच. त्याचं हे वादळी आयुष्य आता रुपेरी पडद्यावर येतंय. मी सिंधुताई सपकाळ या नावाने बनणाऱ्या या चित्रपटात सिंधुताईचा जीवनपट उलगडला आहे.

 नुकताच बर्लीन महोत्सवात या चित्रपटाचा फर्स्ट लुट, स्टील फोटो आणि थीम मांडण्यात आली. त्यावेळी साऱ्यांचीच मने हेलावली. अर्थात हे शिवधनुष्य उचलायला टिमही तेवढीच तगडी हवी ना. ज्येष्ठ अभिनेते आणि अनंत महादेवन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सचिन खानोलकर यांनी चित्रपट निर्मिती. यात तेजस्विनी पंडीत सिंधुताईची भुमिका साकारतेय तिच्या सोबत उपेंद्र लिमये, सुहास पळशीकर, ज्योती चांदेकर, नीना कुलकर्णी, उदय टिकेकर, विनय आपटे, जयवंत वाडेकर अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. मी वनवासी या पुस्तकावर आधारीत असलेल्या या चित्रपटाला संवाद जयंत पवार आणि अशोक पत्कीचे संगीत लाभणार आहे. थंडी वाजत असताना चितेची शेक घेणाऱ्या आणि गरिबीमुळे पिंडाचा भात खाणाऱ्या या शेकडो लेकरांच्या मायमाऊलीचा हा आयुष्यप्रवास मराठी चित्रपट सृष्टीत जबरदस्त ठरणार आहे, हे मात्र नक्की.

मराठीमाया. कॉम टीम

अधिक लेखांसाठी, करमणुक, जीवनशैली, भटकंती, आरोग्य, आस्वाद, क्रीडा, भेट द्या. या संकेतस्थळाला;

दुवा क्र. १