चर्चाच आहे म्हणे आमच्या
अस्तित्वाची दुनियेतील पीरांना
धमणीतील रक्त सांडले ज्यांनी
विचारा की त्या धर्मवीरांना
टाळ आज हि निनादता
घर सोडून वारकऱ्यांचा साथी
पांडुरंग आहे का जगी इथे
की पेललय कोणी धरांना
माझ्या असण्या नसण्याने इथे
तुम्हाला काही कमी नाही ना?
जगा तुम्ही अश्याही दुनियेत
भाव विभोर नाचू द्या की पोरांना
यत्र तत्र सर्वत्र मीच आहे
तरी जाणीव रोज देत असतो
नसेल होत अजूनही निरसन
विचारा की आपल्याच स्वरांना
पराधिनता हा नियमच आहे
सृष्टी रचिते वेळी हा माझा
आन हि अधीन ब्रम्हांड माझ्या
विचारा आपल्या विचारांना
स्विकारण अवघडच म्हणून
नाकारताय की मला जणू
ही ही एक माझिच भक्ती
आठवा की त्या दैत्येश्वरांना