गणगोत

माझ्याकरता होते, कायमच वादळ;
माझ्याकरता होत्या भरतीच्या लाटा!
माझ्याकरता नव्हताच, राजरस्ता कुठला;
माझ्या होत्या या फसव्या पायवाटा!

माझी नव्हती कधी, सुर्यास्तांची होळी
मध्यान्हीचाच सूर्य खरा!
आभाळ होते भरलेले, पण
तोही दिखावा होता सारा!

माझ्यासाठी नव्हता कधी
तो उघडा दरवाजा,
माझा  नव्हताच कधी
तो सोनेरी किनारा!

रस्त्यासोबतच चालत राहिलो,
तेव्हा गाणे माझे होते;
लाटांवरच मी जगलो,
माझा होता बेफाम वारा!!!!