डोळे मिटूनी पिते दुध, गोबरी ती मनी
पाहिले बोक्याने आणि वरले तिला मनोमनी
मनातल्या मनात तो रडे, अन मनी मनी ओरडे
त्रासलीच ती, वाटे फोडावे ह्याचे नरडे
वारकरी मनी, करे त्याचा मनोमन तिरस्कार
तो उगिच गुरगुरणार, आणि ऊंदीर खाणार
तो जीभ चाटतच हळुच बघे मनीकडे
वाटे, माय मरो पण मावशीच दिसो चहुकडे
खाली मुंडी घालुनी ती जमीनीला ओरखडे
चावट, मेला, ह्याचे एकदा रस्त्यातच काढते वाभाडे
बोका म्हणे,
माणुस तर नाही ना मारला मी,
असलाच तर घेईन हातावर जळता निखारा
आणि मारीन काशीच्या चकरा
कितीही सोसेन पण मीच होणार ह्या मनीचा नवरा