जाणे जवळ त्याच्या नियतीचाच भाग आहे
उणे पुरे तेल पणती फडफडती वात आहे
मातीत रुते काळ घोट कर्णाचाच घ्याया
भिऊ नको पुन्हा तू तेथेही मीच आहे
माझीच कर्मे सगळी कर्मास सगळे बाध्य आहे
गेला एक दुजा आणखी मुखी ग्रास आहे
संचिते भोगासी जन्म पळे पळे काळ भोगी
पळे पळे तोडी त्याला संपणार तो ही आहे
आकळे कधी का काळ ज्याचाच त्याला
खंत प्राक्तनाची कशाला ते तर पुढेच आहे