नंतरचे साक्षात्कार

काही कंपन्यांमधील (विशेषतः आयटी)अनुभव असाः

चर्चासत्राच्या जागेची, बैठकांच्या खोल्यांची नावे एच-१, एच-२(हॉल एक, हॉल दोन इ.) अशा इंग्रजी पध्दतीने ठेवली जातात.
कालांतराने ही नावे बदलून हिमालय, द्रोणाचार्य अशी ठेवली जातात. 
मी ज्या कॉलनीत राहतो तेथेही इमारतींची नावे बी-१, बी-२ अशी ठेवलेली होती. आता बदलून शरयू, कावेरी अशी केलेली आहेत.

प्राथमिक अनुमान असे की, संबंधितांना कालांतराने वाटते की, इंग्रजी नको. आपल्याच संस्कृतीतील नावे आपण द्यावीत.
सुरुवातीला नावे देतानाच आपल्या पध्दतीने का ठेवली जात नाहीत?
नंतर साक्षात्कार होण्याचे कारण काय?