गूढकथा: कालग्रहांचे भविष्यआरसे! (भाग-१)

दि. २२/०२/२०२२- मंगळवार- वेळ सकाळी चार

मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता.

"स्कोटा" कार ताशी ८० च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत.

त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता.

त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "राहुल, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून? "

राहुल म्हणाला, "मला नेमकी माहिती मिळायला मेहेनत करावी लागली रे. पण शेवटी मिळाली. शहरात नेमकी डीलीव्हरीची शक्यतो पहिली केस कोणती हे "

डॅनियलः "मित्रा, मला उत्सुकता लागून राहीली आहे. कसा असेल तो जीव? आतापर्यंत सगळं जग शांत झोपलंय. ते अनभिज्ञ आहे की आज मध्यरात्री बारा वाजेनंतर जन्मलेल्या अनेक जीवांपैकी हा एका जीव एका अभूतपूर्व बदलाची सुरुवात असेल. "

राहुलः "डॅन, अजून ते निश्चित नाही. म्हणूनच तर आपण बघायला जाण्याचा एवढा आटापीटा करतोय. बघितल्यावर खरे काय ते कळेल. कदाचीत ते गुणधर्म नंतर जाणवायला लागतील आपण अजून बरेच जीव बघून त्यांची नोंद ठेऊ. त्यांचा पुढे फॉलो अप करू"

डॅनियलः "ओके राहू.. पण आपला अंदाज खरा ठरेल बघ. "

राहुलः "डॅन, डोंट कॉल मी राहू... इट मेक्स मी फिल डीमन लाईक"

त्यांचा तो संवाद सुरू होता. गाडी वेगाने धावतांना दिसत होती. वरून बरसणाऱ्या पावसाच्या धारांना झेलत. अजून बरेच अंतर पार करायचे होते. एक मोठा पूल पार केल्यावर "ट्रेड सेंटर" आणि मग ते भलेमोठे हॉस्पीटल. समल हॉस्पिटल.

त्या हॉस्पिटल मधील बारा वाजेनंतरची ही पहिली डीलीव्हरी. आईसोबतचे नातेवाईक. आईची आर्त कींकाळी. मग बाळाचा रडण्याचा आवाज..... अन बाळ बघून डॉक्टरच्या डोळ्यात एक अभूतपूर्व भीतीयुक्त चमक....!!

... मध्ये शिरतांना राहुलला सुरक्षारक्षकाने आणि इतर अनेकांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने सगळ्यांच्या डोळ्यात एका उपकरणाद्वारे काही मिनिटे प्रभाव असलेली एक इमेज प्रोजेक्ट केली ज्यामुळे तितकी मिनिटे त्या सगळ्यांना एक ठरावीक चित्र डॉळ्यासमोर दिसले. राहुल दिसला नाही. तो आत शिरेपर्यंत.

डॉक्टरच्या डोळ्यातली ती अभूतपूर्व भीतीयुक्त चमक राहुलच्या डोळ्यातही दिसली. म्हणजे आता सगळ्यांना कळणार. काहिही लपून राहाणार नाही?

असे सांगणार जगाला समजावून?

ही बातमी टी. व्ही वर यायला सुरुवात झाली.

त्याच सकाळी सहा वाजतांनाची गोष्ट.

शहरात एके टीकाणी पावसामुळे ट्रॅफिक जाम होता. एका पिवळ्या कारचालकाचा दुसऱ्या लाल कारला अगदी थोडा धक्का लागला होता.

पण लाल कारचा मालक सरळ गाडीखाली उतरून पिवळ्या कारच्या मालकाला भोसकू लागला. जवळ जवळ जिवानिशी मारणार होता तो. ही बातमी टि. व्ही. वर आली. एवढ्याशा घटनेमुले कुणी इतके हिंसक कसे होवू शकते बरे?

... प्रसिद्ध चित्रकार सुरेश संत हे चित्र काढता काढता अचानक थांबले. त्यांना आज सकाळपासून उत्स्फुर्तपणे काही सुचतच नव्हते. असे पहिल्यांदाच होत होते. उभ्या आयुष्यात. ते चित्र काढूच शकत नव्हते. काढता काढता मध्येच त्यांनी अपूर्ण राहीलेल्या चित्रावर काट मारली. आतापर्यंतची मेहेनत वाया गेली. त्यांनै स्वतःच ती वाया घालवली. ही बातमी टी. व्ही वर ठळकपणे येत होती. त्यांनी चित्र काढायचे कायमचे थांबवले. कारण चित्र म्हणजे काय हे जवळपास त्यांना कळेनासे झाले होते. हा स्मॄतीभ्रंशाचा प्रकार होता का? नाही. इतर सगळे त्यांना आठवत होते, फक्त चित्र कसे काढायचे ते सोडून...

अंधेरीच्या एका फ्लॅट मध्ये डॅनियल शी बोलताना राहुल या सगळ्या बातम्यांची सांगड घालत होता.

त्या दोघांव्यतिरिक्त इतर अनेकांना या घटनांची सांगड घालता येत नव्हती. शक्यच नव्हते ते.

डॅनियल शी बोलून झाल्यावर राहुलला तो दिवस आठवला.

एके ठीकाणी उत्खननात भिंतीवर लिहिलेला तो विचित्र संदेश आणि त्याखाली असलेले दोन घड्याळांचे चित्र. प्रत्येक आकड्याच्या ठीकाणी एकेक ग्रह. आणि बाजूला त्याच घड्याळाची उलट आरशातली प्रतिमा. अन त्यानंतरच्या आणि आधीच्या काही घटना..

आजचे ते बाळ!

टि. व्ही. वर आता अनेक विचित्र अविश्वसनिय बातम्या येवू लागल्या. आज असे काय घडले?

(क्रमश:)

- निमिष सोनार, पुणे