माणूस सापडला मला

ताब्यातला माणूस सापडला मला
माझ्यातला माणूस सापडला मला

खोलात होते कोण नाहीच कळले
पाण्यातला माणूस सापडला मला

तो बैल गाडीचा मला नेतो घरा
प्राण्यातला माणूस सापडला मला

झालीच ओढाताण आयुष्यभर ती
घाण्यातला माणूस सापडला मला

पाठीवरी केलाच हल्ला खोल तो
नात्यातला माणूस सापडला मला