कोकणातील घर

प्रत्येक कोकणी माणसाचं स्वप्न असतं

कोकणात असावं घर मस्त

घराला असाव्या चिऱ्याच्या भिंती

चिऱ्याला रंगवलेली पट्टी चुन्याची

घरासमोर असावं छोटेसे अंगन

अंगनाला असावं बांबुच कुंपन

घरासमोर असावी छोटीसी बाग

छोट्या छोट्या झेंडूची असावी पांग

घराच्या पाठीमागे छोटीशी आमराई

आंब्यावर फिरणारी छोटीशी खारुताई

घराजवळ असावी छोटीशी नदी

नदीमध्ये डोलणारी छोटीशी होडी

                     कमलेश सहदेव नवाळे