सुखाचे स्वागत..

दारात थबकलेल्या सुखाचे

ये म्हणून स्वागत केले ;

उत्साहाने उंबरठ्यावर

पाऊल त्याने ठेवले !

आत येता येता

 सुख.. तिथेच घुटमळले

 कुणास ठाऊक काय झाले ?

 सुखाचे पाऊल अडखळले !

 पाठीशी वळून जरा

मी डोकावून पाहिले-

 तेव्हा कुठे माझ्या

 सारे लक्षात आले !

 एवढे मोठे माझे घर

 दुःखानेच भरले-

 सुखाच्या बोटालाही

 स्थान नाही उरले !!