तुला भेटताना नित्य वाराही भारावून जातो
तू असण्याचा सुगंध सदा सर्वत्र दरवळतो
तुझे अस्तित्व हाच एकमेव आधार आहे
तुझ्या दर्शनाचा आनंद मला अपार आहे
ऊठता - बसता सदैव ध्यास तुझाच असतो
कधितरी भेटेल मला आस मनी धरतो
तुझ्या समीप येण्याची धडपड सुरू आहे
वाटेतल्या भाट बडव्यांची कटकट कायम आहे
दर्शनाच्या रांगेत मी तासनतास ऊभा राहतो
तुझ्या प्रसादाच्या आनंदात नाचत गात असतो
तुझ्या दर्शनाचे सुख सदा लाभावे देवा
तुझे नाम घेता माझा मला विसर व्हावा