शाळा हा शब्द एकताच असंख्य अशा मनात घर करून राहीलेल्या आठवणी अगदी उफळून येतात. शाळा हा शब्द मुळात आत्मीयता निर्मान करणारा आहे. माझी आई या शब्दा प्रमाणे माझी शाळा हा शब्द आत्मीयता निर्मान करणारा आहे. शाळा म्हणजे तेजोमय मार्ग जो अज्ञानाच्या खायी पासून समाजाला दूर ठेवत असतो. शाळा हा शब्दच मुळात गंगेसारखा निर्मळ आहे.
खेडे गावांचा विचार करता शाळेला फारच महत्त्व आहे. गावात परिवर्तन घडवून आणण्याची शाळेमध्ये फारच मोठी ताकद असते. गावात एकोपा निर्माण करण्याची महत्त्वाची भुमीका ही शाळा बजावत असते. शाळा हि लोकाना जोडणारा जणू दुवाच आहे. शाळेमध्ये होणारे कार्यक्रमा पासून ते शाळेच्या डागडूजी पर्यत लोक हे आनंदाने सामील होत असतात. हिच शाळा गावाच्या सुख दुःखात सामील असते. गावात प्रतेकजण शाळेचा उल्लेख माझी शाळा असा करत असतो. म्हणून शाळा ही देशाला अलंकार आणि हिऱ्याना पैलू पाडणारी महान असे मंदीर आहे.
पण आज गावातल्या शाळा आता शेवटच्या घटका मोजत आहेत. आणी त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे वाढते शहरिकरण होय. लोकांचा ओघ आता शहरांकडे वाढला आहे परिणामी मुलांच्या अभावी गावच्या ओस पडू लागल्या आहेत. मुलांअभावी शिक्षकांची संख्या आता घटू लागली आहे. इकडे शहरात मात्र शाळा पोरांनी ओसंडून वाहत आहेत़. उलटी गंगा म्हणावी ती अशी.
गावच्या शाळा वाचविण्यासाठी आता आपण प्रयत्न केले पाहिजे . शाळा नसताना आम्ही जे भोगले ते आमच्या भावी पिढीने भोगू नये हिच माफक इच्छा आहे.
कमलेश सहदेव नवाळे