हूल

किती व्यस्त आहेत श्वास चरांचे
चलन फुकाचे त्या त्या परी
व्यय कोण तयांचे नियंत करी
दळत आहे दळी रोज जात्यावरी

स्त्रोत थांबे न भंगे; जणू वेठ ही
भाकरीची अखंड अथक चाकरी
मेहताना तिचा वर्धते पोकळी
आकळे ना मुळी; रीत कळते तरी

जाणिवा भावना आर्त; वाटेवरी
पाश नात्यातले; खुंट गोतावळी
बागडावे कसे मोकळे श्रीहरी
देत चाहूल ना रे तुझी बासरी

.............. चारवा