मी फिरून मागे गेलो होतो.....
पाहिला वृक्ष त्या तिथेच त्याच्या जागी......
सारेच बदलले होते
एकांत व्यापला होता
बहु इमले अवती भवताली.....
..... पण छाया तशी होती
आठवे भेट त्या खाली -
पहिला स्पर्श जाणला होता......
चाळवतो ती मऊ पिसे -
विखुरल्या वचनांची श्वासांनी.......
डोळ्यांत पाहिलेला स्वप्नांचा पढा...........
..... वाचतो पापणीतळात; ...... ओल्या पलकांनी
उत्छृंखल कुठेच नव्हते.....
काळीज विदारून होते;.... तसेच आज...
त्या शाखा-पर्णांवरची गाणी..........
आजही गूढ तृषार्थ,......
आळविती आंतिल आर्त,.....
... कोकिळा विलाप-सुरात
...................चारवा