"तोडपाणी"
आज राजकारणात सर्व कडे आहे तोडपाणी ॥ध्रु॥
जर व्यवहार जमला नाही तर करतात गाऱ्र्हाणी ॥
सतत त्यांना सत्तेत राहायचे असते॥
कधी यांचेशी तर कधी त्यांचेशी त्यांचे जमते॥
अशीच त्यांची दिसते सर्वांना हात मिळवणी ॥ध्रु॥१॥
जनतेच्या कामांचा त्यांना नसतो पुळका।
सभोताली हवा असतो कार्यकर्त्यांचा घोळका ॥
त्यासाठी करतात वाममार्गाने पैशाची जुळवणी ॥ध्रु॥२॥
अनंत खोंडे.
२१\०९\२०१०.