वचन

वचनात तू स्वतःच्या मज बांधलेस होते, विरहात की तुझ्या मी व्याकुळणार नाही ..

     निद्रिस्त जाणिवांचे देऊ कसे हवाले, जागेपणीही माझा मी राहिलोच नाही ..

परतून येत असता असतेस सोबती तू, भासात स्पर्श आहे पण हातात हात नाही ..

     उजळून लाख तारे स्मृतिगंध ओतताना, माझीच स्पंदने पण माझी न राहिली ती ..

स्मरणात त्या तुझ्याही भासेल चंद्र मजला, आता रितेपणा हा मज दाहणार नाही ..

     सर्वस्व तूच असशी मग शोक का वृथाचा, वचनी तुझ्या अडकलो ते मोडणार नाही ..