भिजलेला पाऊस

एक नवीन नात फुलत होत,
संसाराच्या स्वप्नात झुलत होत,
अचानक गार वर सुटल,
घेऊन ओलावा आकाशात
काळभोर आभाळ दाटल,
आकाशातन एक एक थेंब
धरणीला स्पर्श करत होता,
तीच लक्ष पावसाकडे होत
पण तो तिला न्याहाळत होता,
तिने हाथ फैलावले आणि
पावसाचे थेंब झेलू लागली,
गालावरची खळी तिच्या आता
पावसासोबत बोलू लागली,
त्याने तिला जवळ घेतल आणि
पावसाचा जोर वाढू लागला,
नजरेत नजर भिजत गेली अन
पाऊस तसाच पडत राहिला.
           - महेश आल्हाट, मोशी