"का काळीज माझे जळे"
उगा का काळीज माझे जळे॥
पाहुणी भ्रष्टाचार्यांचे जाळे॥ध्रु॥
कुठे ना दिसला सज्जन कोणी।
अधिकारी नि राजकारणी॥
अवघे आलो त्रिभुवन धुंडूनी;
सर्वजण पैशा मागे पळे॥ध्रु॥१॥
सरकार दप्तरी असे काम ।
त्यासाठी मोजावे लागे दाम॥
जर नच दिले तुम्ही दाम;
झिजती चपलांची हो तळे॥ध्रु॥२॥
नवी असो कोणती योजना।
विघ्ने घालतात त्यात नाना॥
जन हिताची ना पर्वा त्यांना;
चाखती पैशाची ते हो तळे॥ध्रु॥३॥
या सारेजण आता पुढती।
साधण्या देशाची या प्रगती॥
एकीची घेऊन मशाल हाती;
जाळा हो ही सारी भ्रष्ट मुळे॥ध्रु॥४॥
अनंत खोंडे.
६\१०\२०१०.