ऍमेझॉन. कॉम येथे खरेदी

मला एक द्विनेत्री खरेदी करायची आहे. त्याबाबतीत मित्रांशी बोलताना मला एका मित्राने सांगितले की नोव्हेंबर मध्ये ऍमेझॉन. कॉम ह्या साईटवर खरेदी कर कारण चांगला डिस्काउंट मिळेल. कारण अमेरिकेत त्यावेळेला Thanks Giving Day असतो. पण त्याने स्वतः कधी ऑनलाईन खरेदी केली नसल्याने तो जास्त माहिती देऊ शकला नाही.

आपल्यापैकी कोणाला ह्याबद्दल काही माहिती आहे काय?

खरेदी केलेली द्विनेत्री मी भारतात पुणे येथे मागवणार आहे. ह्या अनुषंगाने मला खालील शंका वाटतात.
- जर अशी काही वस्तू आपण खरेदी केली तर त्यावर काही इंपोर्ट ड्यटी भरावी लागते काय? असल्यास किती भरावी लागते?
- ऍमेझॉन वरून खरेदी केलेल्या वस्तूच्या वॉरंटीबाबत काय प्रक्रिया आहे? वॉरंटी काळात गरज पडल्यास आपण खरेदी केलेल्या वस्तूच्या संबंधीत कंपनीकडून किंवा त्या कंपनीच्या अधिकृत इंजिनिअरकडून भारतातच सेवा मिळू शकते काय?
- ऍमेझॉन सारख्या संकेतस्थळावरून किंवा परदेशातून मागविलेल्या कोणत्या वस्तूंवर किती इंपोर्ट ड्युटी भरावी लागेल ह्याची सविस्तर माहिती कोणत्या संकेतस्थळावर मिळेल?

मी ऍमेझॉनवर जाऊन पाहिले. त्यांच्या चार्जेसबद्दल थोडी माहिती मिळाली पण मी पुर्णपणे कन्व्हिन्स झालो नाही.

भारतात डिलिव्हरी घेणे तसेच गरज पडल्यास इथेच सेवा घेणे ह्यासाठी कुठले संकेतस्थळ चांगले आहे?