गावरान मेवा १) तरले

  • तरले एक किंवा दोन जुड्या
  • उकडण्यासाठी पाणी
  • मिठ
२० मिनिटे
५ ते ६ जणांसाठी

तरले म्हणजे ताडगोळ्याच्या नुकत्याच उगवलेल्या रोपाचे मुळ. ताडफळ झाडावरच पिकून खाली पडतात. त्याला पावसाळ्यात मोड धरतात. हेच मोड जमिनीत रुजून त्याला चे रोप बनते. पण ह्या छोट्या रोपाची उंचीही किमान १ फुटापेक्षा जास्त असते. हे मुळ काढण्यासाठी मुळाच्या बाजुने गोल खोल खड्डा करत अलगद हे मुळ काढतात. एवढे परिश्रम करुनही हे तरले अपरीचीत असल्याने त्यांना योग्य तो भाव मिळत नाही. केवळ १० रुपयांना एक जुडी मिळते. एका जुडीत ५ तरले असतात.

लागणारे साहित्य:
गरजेनुसार तरल्यांच्या दोन-तीन जुड्या
मिठ
उकडण्यासाठी पाणी

कृती :
प्रथम तरले धुवून त्यांचे दोन इंचाइतके किंवा आपल्या आवडीनुसार तुकडे करावेत.

तुकडे एका टोपात ठेउन ते बुडतील इतक पाणी घालावे. मग अंदाजे मिठ घालून १५ ते २० मिनीटे शिजून द्यावेत.

शिजून थोडे थंड झाले की प्लेट मध्ये सर्व करावेत. (कामवाली नसेल किंवा भांडी घासायचा कंटाळा आला असेल तर अश्याप्रकारे पेपरडिशमध्ये काढा. फार उपयोगी टिप आहे हो ही)

कस खायचे हे तरले ह्या बाबत तुम्ही गोंधळला असाल म्हणून हा खालील फोटो. पहिला बाजुच साल काढून घ्या. मग निघालेला गर मधून फोडा. हाताने सहज तुटतो. आता त्यातील मधली कडक दांडी काढून टाका. राहीलेला गर मिटक्या मारत खा. साधारण कसऱ्यासारखे लागतात.

तरले खाताना चोथाही लागतो.

माहेरून आणलेले ज्ञान