धिक्कार

झालाच आज धिक्कार माझा

गेला दबून चित्कार माझा
मी तो नव्हेच, ना पाप माझे
का एव्हढा तिरस्कार माझा
का वाटते स्वतःचीच शरम
केला लपून सत्कार माझा
हे श्रेय देखणे दूसऱ्याचे
हा तो नव्हे अविष्कार माझा
वेडाच वाटलो ना तुम्हाला
ऐकाच धूर्त फुत्कार माझा