विद्वान सर्वत्र पूज्यते |

विद्वान सर्वत्र पूज्यते |
आजच्या जगात हे विधान सत्य नाही, असे वाटावे
अश्या घटना दररोज घडत असतात. पण मला माझ्या विद्वत्ततेने (? हा! हा! )
काही सुखद अनुभव दिले आहेत.  त्यातला हा एक,
कुवेत कंपनीच्या विमानाने
अमेरिकेहून भारतात  येत होतो. मी नेहमीच उन्हाच्या विरुद्ध बाजूची पंखावर
येणार  नाही अशी खिडकी पकडतो. विजय वाघ (माझे मित्र, पूर्वी Air India
मध्ये नोकरीला होते) यांनी ही युक्ती सांगितली. त्या दिवशी  भरपूर ढग होते
व विमान 11००० मीटर  वरून जात असल्याने बाहेर ढगांच्या झगझगीत पांढऱ्या
चादरी शिवाय काहीच दिसत नव्हते. अन्न्यथा  मी पूर्ण वेळ खिडकीतून प्रदेश
न्याहाळत असतो.
खूप मनोहर दृश्शे दिसतात. मुंबई नागपूर प्रवासात, औरंगाबाद जवळचे लोणार
सरोवर अप्रतिम दिसते. डोंगर दऱ्या व छोटी मोठी गावे. अमेरिकेतले शेकडो
किलोमीटर लांबीचे सरळ रस्ते. तिथली प्रचंड आकाराची गोल शेते, हिरव्या
पिवळ्या रंगांच्या विविध छटेच्या गोल टिकल्या शेजारी शेजारी ठेवल्यागत
दिसतात. समुद्राच्या लाटा व वेगात जाणाऱ्या छोट्या बोटी. नुसत पाहत
रहावं!  एकदा मी विमानातून पूर्ण इंद्रधनुष्य व एकदा सकाळच्या वेळी
ढगांवर  सूर्याचे प्रतिबिंब पहिले आहे. अगदी मृगजळात दिसावे असे. रात्रीतर
आकाशात व जमिनीवर दोनीकडे पसरलेले तारेच तारे. नेहमी पेक्षा वेगळ्या
कोनातून परिचित नक्षत्र नवीनच वाटतात.

त्या दिवशी बाहेर पाहणे अशक्य झाल्यावर  मी Kakuro कोडे सोडवायला
घेतले. माझे पोतडीत नेहमीच काहीतरी डोक्याचा  खुराक ठेवलेला  असतो,
त्यामुळे मी प्रवासातच  नव्हे तर कुठेच कधीच bore होत नाही. Kakuro
कोड्यात वेगवेगळ्या आकड्यांचे संच लागतात. मी ते करत असतांना मधून मधून
हवाई सुंदरी कुतूहलानी मी काय करतो आहे हे समजावून घ्यायचा प्रयत्न करीत
होती. मग मीच तिला म्हटलं, बस इथे मी तुला हे कोड शिकवतो. ती खूष झाली.
कोड समजावून घेतल्यावर, आपल्या इतर सहकाऱ्यांना एकेकाला बोलावून, हा बघा
गणितज्ञ काय करामत करतो आहे असे सांगत होती / असावी. 
सर्वांजवळ माझे कवतुक करून झाल्यावर, परत माझ्याजवळ येवून मला म्हणाली कि,
"I want to serve you (मला तुमच्या सेवेचा मोका द्या)". मला त्यांचे कडील
पेरूचे पेय आवडले होते. मी म्हटलं मला पेरू-पेय आवडले पण ते संपले आहे
ना?. ती लगेच म्हणाली होय संपले असावे,  पण तरी पण मी शोध घेते. आणि काय
म्हणताय राव थोड्यावेळानी पृर्ण एक लिटरचा डबा मला आणून दिला ( प्या किती
प्यायचं ते). तर एकुणात काय, "विद्वान सर्वत्र पूज्यते".          
वसंत बरवे (२५ औक्टोबर २०१०)