फक्त स्वप्न पाहिजे खरेखुरे जगायला
आणि जिद्द पाहिजे पूर्ण ते करायला...
शक्यता-अशक्यता राहतात भोवती
बळ मनात पाहिजे अशक्य शक्य व्हायला...
शौर्य, धैर्य, शिस्त जो बाणतो स्वतःमध्ये
धावते नशीबही साथ त्यास द्यायला...
प्रेरणा निसर्गतः, म्हणून फूल उमलते
आत ओल लागते बीज अंकुरायला...
डगमगू नकोस तू वादळातही 'अजब'
मार्ग धर, दिशा ठरव, सज्ज हो भिडायला...