क्षणभंगुर - २

अमोघ च्या मनात हे सर्व विचार आणी कित्येक गोष्टी आज गोंगाट करत करत होते..
तसे तो झपाझप पा‌ऊले टाकत टाकत घरी कधी पोहचला हे त्याचे त्यालाच कळाले नाही..
घराची बेल वाजवली तसे अमोघ च्या वहिनीने दार ऊघडले..
वहिनींकडे बघताच त्याला नेहमीप्रमानेच कळवळुन आले..
त्याची वहीनी "अंकिता".. त्यांचे बी.ए. डी. एड. झालेले होते.. मुळच्या त्या कोकणातल्या..
ज्या दिवशी त्यांचे लग्न झाले.. अगदी त्याच्या नंतर बरोबर एक वर्षाने त्यांना एक खुप मोठा अपघात झाला.. टाटा ईंडीका ने त्यांना ऊडवले होते.. नशीब बलवत्तर म्हणुन प्राण नाही गेला..
त्या अपघातात त्यांच्या मेंदुला खुप मार लागाला होता.. .
अंगाच्या खालच्या भागाला पॅरेलीसीस झाला ... त्यामुळे त्या व्हीलचेयर वर असत.. जमेल तेवढे घरकामात मदत करायच्या पण पॅरेलीसीस असल्यामुळे खुपच लवकर थकवा जाणवायचा...
अमोघ ही त्यांना नेहमी खुष ठेवायचा प्रयत्न करत असे..
आज ही त्यानी न विसरता.. वहिनीं साठी त्यांच्या आवडीचे समोसे आणले होते..
अमोघः (चेहर्यावर जमेल तेवढा आनंद दाखवत) वहीनी ढँ टं ढँ पेश हे आपके लिये आपके पसंद के गरमा गरम समोसे..
आणी वहीनी हे पहा आज फुले मंड‌ई तुन भाज्या आणल्या आहेत पुर्ण आठवडा जा‌ईल .. बाजार स्वस्त होता आज... आणी कसली गर्दी असते हो तिकडे.. आजकाल.. पॉप्युलेश कंट्रोल करायलाच हवे...
वहिनी: अमोघ मी तुला मागच्या ४ वर्षांपासुन ओळखते.. ओठांवर जरी शब्द नेहमी प्रमाने असले ना तुझ्या, तरी तुझा चेहरा सगळे सांगतोय..
काय झाले आज??
अमोघः दादा... वहिनींना हे काय होते रे अधे मधे.. काही पण प्रश्न विचारतात.. आता मस्त पैकी चहा आणी समोसे खायचा मुड आहे तर म्हणे चेहरा बदलला आहे माझा..
दादा: तिच्या पासुन कधी काही लपत नाही.. काय झाले ते सांग..
अमोघः ओके.. आज नमीता भेटली.. लक्ष्मी रोड्वर..
काय????????????????????????
दादा आणी वहिनी नी एकदाच दचकुन ओरडले ...
वहिनी: कशाला भेटली आता? आणी तु नको नादाला लागु झाले तेवढे बस्स झाले ना..
दादा: हो ना असेच म्हणतो.. काय गरज भेटण्याची.. झाले तेवढे खरेच पुष्कळ झाले आणी ४ वर्ष झालेत ह्या गोष्टीला... कशासाठी भेटताय परत??
अमोघः अहो ऐका तरी.. ती अचानक भेटली.. आम्ही काही ठरवुन वगैरे नाही भेटलो.. आणी हो
ती आणी अमित ईकडे पुण्यातच आलेत रहायला.. त्याला ईकडे चांगल्या कंपनी मधे जॉब मिळाला आहे.. १२ लाख चे पॅकेज आहे..
वहिनी: हो का .. व्वा छान.. बघा शिका ह्यातुन काहीतरी.. नाहीतर तु बघ.. स्वतः कडे
आज तुला चांगली नौकरी आहे.. २-३ चांगले स्थळ आणले आहेत आम्ही.. तरी त्या नमीतचे विचार जाता जात नाहीत डोक्यातुन..
तुला १००० वेळा सांगितले .. अरे एक मुलगी चांगली नाही मिळाली तरी बाकीच्या चांगल्या नसतात का?
जसे ५ बोटे सारखे नसतात तसेच सगळ्या मुली पण सारख्या नसनार..
नीट विचार कर... त्या जळगाव च्या मुली चा प्रस्ताव आहे.. मला आणी दादा मुलगी पसंत आहे..
दादा: बरोबर म्हणत आहे अंकिता.. ते काही नाही .. तुझ्या डोक्यातले खुळ काढुन टाक एकदाचे..
अमोघः दादा आणी वहिनी.. हे पहा. मला तुमच्या भावना बद्द्ल खुप आदर वाटतो.. पण मला सेकंड चान्स नको आहे आयुष्यात.. आणी मी आता जसा आहे तसाच सुखी आहे..
आणी ईथुन पुढे ह्या विषयावर परत परत चर्चा नको आहे प्लीज.. मला खुप चिडायला होते हे तुम्हाला माहीती आहे..
आणी वहिनी तुम्ही नमीता ला वा‌ईट वगैरे समजु नका...
एकंदर परिस्थीती पाहता तिने जे केले आहे ना.. तुम्ही तिच्या जागी असता तर कदाचित तेच केले असते..
सो प्लीज.. ईनफ इज ईनफ...
अमोघ चिडुन सरळ त्याच्या रुममधे गेला..
आणी आज नमीता भेटल्यामुळे.. कित्येक दिवसांनी त्याच्या मनातला एक कोपरा खुप सुखावुन गेला होता... खरे तर ती त्याच्या आयुष्यातुन ४ वर्षापुर्वीच निघुन गेली होती.. पण पहिले प्रेम ते पहिलेच असते. कितीही केले तरी विसरता येत नाही.. ह्या ४ वर्षात अमोघ नी मुलीं पासुन स्वता: ला फार दुर ठेवले होते... फक्त कामापुरता काय तो संबंध ठेवायचा ऑफिस मधे...
डोके ऊशी मधे खुपसुन तो कितीतरी वेळ ... पडुन होता... त्यानंतर त्याच्या नकळतच त्याने.. नमीताने लिहीलेले प्रेम पत्र आणी गिफ्ट्स वगैरे कपब्र्ड बॅगेतुन काढुन पाहु लागला...
त्याच्या डॉळ्यातले पाण्याचे थेंब त्या प्रेम पत्रांना केंव्हाच ओलावा दे‌उन गेले होते...
त्यातीलच एक पत्र तो परत परत अगदी वेड्यासारखा वाचत होता...
"दि. २५ नोव्हें २००४
प्रिय अमोघ..
परिक्षा संपुन आता चक्क १५ दिवस झालेत.. आणी कसा रे तु.. तुला एकदा पण मला फोन नाही करावा वाटला का? की भीती वाटली बाबांची (हा हा हा) ..
तसे बरेच झाले केला नाहीस फोन... गावाकडे प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही... ऊगीच कुणाला कळले असते तर फुकटचा प्रॉब्लेम झाला असता..
आजी आजोबा .. आणी आम्ही ६ नातवंडे.. खुप धमाल करत असतो..
पण तुझी कमतरता जाणवतेय.. ह्या दिवाळी तु पण असतास ना.. (म्हणजे कसे जावा‌ई बापु आणी ते पण सासरी) कसले लाड झाले असते ना तुझे...
हे भविष्यात कधी ना कधी हो‌ईलच फार नाही फक्त १ किंवा २ वर्ष आजुन...
ह्या दिवाळीला सुट्टी साठी खरे तर मुंब‌ईतच रहायची ईछा होती माझी .. पण माझे कोण ऐकते घरात .. तुला तर चांगलेच माहीत आहे... तुझ्या सासुबा‌ईचा स्वभाव ... तिच्या हट्टा पुढे खुद्द देव जरी आला तरी त्याचे काही चालनार नाही...
असो.. ईकडे नाशिक खुपच मस्त सिटी आहे रे.. मी तुला खुप मिस करतेय आय स्वियर...
आम्ही सगळे काल नाशिक - त्रंब्यकेश्वर रुट वर.. सोमनाथ चे मंदिर आहे... कसली अल्टिमेट जागा आहे ... आम्ही बोटींग पण केले तिकडे तुफान मजा आली..
काहीही म्हण तु असायलाच हवा होता...
ते काही नाही.. आपले लग्न झाले की पहिल्यांदा फिरायला माथेरान, नंतर महाबळेश्वर आणी मग ईकडेच यायचे.. नो चेंजेस विल बी ऍक्सेप्टेड...
काल फारच गंमत झाली.. गाडी मधे मी मुद्दाम तुझ्या आवडीचे किशोर कुमार चे "ये श्याम मस्तानी:"
लावले..
अक्षरक्षः सगळे जण डोळे फाडुन बघत होते ... अगदी लहान पणा पासुन जुन्या गाण्यांचा तिरस्कार
करणारी मी अचानक हे गाणे कसे काय लावले..
खरे सांगु तर मला तुझी खुप आठवण येत होती... म्हणून मी ते गाणे लावले..
आता तु जवळ नाहीस तर तुझी आवड ही सही...
काय चिडवले माहीती सगळ्यांनी.. की अशी कसकाय गाणॅ आवडायला लागले आणी काय काय....
असे नकळत कुणी चिडवले.. की काय मस्त वाटते.
आ‌ई बाबा आणी दादा वहीनी कसे आहेत.. तुझे बाबा दिवाळी ला नव्हते म्हणुन बोरींग तर नाही झाली ना दिवाळी?
खुपच विचित्र फिलींग आहे रे.. कधी एकदाचे आपण लग्न करतोय असे झाले आहे.. ईतक्या
अपेक्षा .. आणी त्यात आपल्या दोघांच्या एका वेगळ्या जगाचे स्वप्न..
ह्या भावनांना शब्दच नाहीत..
रि‌अली आय ऍम मिसींग यु अ लॉट...
तुझीच..
नमीता "
आज ती परत भेटल्यामुळे त्याच्या लुप्त भावनांना आपा‌आपसात संवाद साधण्याची परत एकदा मोकळी वाट मिळाली होती
काय ते एक एक क्षण होते.. नमीता आणी अमोघ ह्यांच्या आयुष्यातील.. रोज अक्षरक्षः रोज.. कँटीन मधे एकमेकांशिवाय जेवन नाही.. रो़ज एकत्रच कॉलेज ला यायचे.. वीकेंड ला तर नुसती धम्माल कधी जुहु बीच तर कधी नरिमन पॉ‌ईंट.. तर कधी आरे कॉलनी..
ह्या दोघांचे गुपीत तर अखख्या कॉलेज ला माहीती झाले होते.. आणी त्याच बरोबर.. अमोघच्या घरी त्याच्या भावालापण.. पण अमोघ परिक्षा व्यवस्थीत पास होत होता.. आणी नमीता ही खुप चांगली मुलगी आहे हे यशस्वीपणे त्याने समजावुन सांगितले त्यामुळे तुर्तास तरी त्यां दोघांना विरोध नव्हता..
अमोघ ने आता हे ना ते कारण काढुन नमीताच्या घरी जात असे...
कधी कॉलेज च्या फंक्शन च्या निमित्ताने .. तर कधी नोट्स द्यायच्या आहेत अशी बरीच कारणे लावुन यायचा..
नमीताच्या आ‌ई वडीलांना पण तो खुप चांगला वाटला..
नमीताची आ‌ई स्वभावानी तापट आणी हेकेखोर असली तरी अमोघ वर तिला फार विश्वास होता..
असेच सरता सरता दिवस सरले.. तसे ह्यांच्या प्रेमाला आता वेगळे रुप ये‌ऊ लागले..
कारण सगळ्यात शेवटची सेमीस्टर राहीली होती.. नमीता ला विप्रो मधे.. तर अमोघ ला टी.सी.एस. मधे प्लेसमेंट मिळाले. त्याच्या आ‌ई वडीलांचा आनंद गगनात मावेनासा झाला..
दिवाळी च्या सुट्ट्या संपल्या तश्या अमोघ आणी नमीता दोघांनेही आपल्या आपल्या घरी सांगुन द्यायचे ठरवले.. कारण नमीताच्या वडिलांनी त्यांच्या एका मित्रा च्या मुलासाठी बोलणी सुरु केली होती.. तसे काही गरज नव्हती.. एवढ्या लवकर लग्नासाठी विचार करायची पण स्थळ खुप चांगले आहे.. असे ऐकण्यात आले होते म्हणुन नमीता चे बाबा सिरियसली विचार करत होते.. .
नाहीतरी आता दोघांच्या ही नोकर्या पक्क्या झाल्या आहेत.. आणी शेवटची तर सेम आहे..
अभ्यासात पण दोघेही हुशार.. नापास व्हायची संभावना पण नाही..
हा सारासार विचार करुन एके दिवशी अमोघ ने त्याच्या घरी सर्व काही स्पष्टपणे सांगितले..
त्याच्या आ‌ईला पण नमीता माहीत होतीच.. त्याच्या दादा आणी वहिनींने परवानगी दिली..
पण लग्ना साठी किमान आजुन १- १.५ वर्ष तरी थांबावे अशी त्यांची ईछा होती..
ह्या तिघांनी पण हो म्हणल्यामुळे अमोघच्या बाबांनी पण होकार दिला....
आता प्रश्न होता नमिताच्या घरच्यांचा... नमीताने आ‌ईला खुप समजावुन सांगुन पटवुन घेतले.. नाहीतरी तिच्या आ‌ईला अमोघ पसंत होताच..
आणी आ‌ईपुढे बाबांचे जास्त काही चालणार नाही हे माहीत होतेच नमीताला..
शेवटी कसे सगळे गोड गोड झाले.. दोन्ही घरच्यांच्या गाठीभेटी झाल्या.. एकाच जातीचे असल्यामुळे तो ही प्रॉब्लेम नाही आला.. आणी सगळ्यात विषेश म्हणजे पत्रिका पण जुळाली... म्हनून नमीताच्या आजी आणी आजोबा दोघेपण तयार झाले...
क्रमशः