उत्सव अस्तित्वाचा
========================
योग उत्सवाचा असा जुळून आला,
लक्ष तारकांच्या जोती सजावटीला..
आनंद सर्वव्यापी जसा प्रत्ययास आला,
तृप्त साऱ्या कामना सण क्षणाक्षणाला...!
साखरे विनाच गोडी आता या जिभेला,
वाद्यवृंद अवघा असे माझ्या संगतीला..
ताटवा गंधकुपिंचा हृदयांतरी उमलला,
आत्मीय जाणीवेचा स्पर्श होता मनाला...!
ठेवा अक्षय सृतिंचा माझ्या कडोसरीला,
कलश अमृताचा सहाय्यक या जिवाला..
अधिकार सूचनेचा चेतनेस प्राप्त होता,
अनुभव संपन्नतेचा चराचरातुन आला...!
========================
स्वाती फडणीस ..................... ०४१११०