नाती
एक वेळ अशी होती।कुठेच औषधी उपलब्ध नव्हती॥
माणसाची किंमत त्यावेळी खूपं होती।
थोडे दुखले खुपले की, नातेवाईक सारे गोळा होत।
आस्थेने विचारपूस करीत, त्या प्रेमानेच रोग पळून जात॥
आज विज्ञान प्रगत झाले आहे।
सर्व रोगावर उपचार निघाले आहे॥
औषधी यंत्रणा सारे उपलब्ध आहे॥।
माणूस जिवंत राहूनही । माणुसकीचा लवलेश नाही।।
ही एकच खंत मनांत होती।" दिसतील का? ती जुनी नाती"२॥
अनंत खोंडे.
१५\११\२०१०