प्रेमात

आयुष्यात कधीतरी, प्रेमात सारे पडतात
प्रेमात पडले की सारेच, कविता करू लागतात
 
तिच्या सोबत बोलायला, त्याची हिंमत होत नाही
डोळ्यासमोरून तिची प्रतिमा, सहजासहजी हटत नाही
रोज तिच्या आठवणीत, शब्द सुचू लागतात
प्रेमात पडले की सारेच, कविता करू लागतात

प्रेमाची गाडी रुळावरून, थोडी समोर जाते
मित्र मैत्रिणीत, यांची चर्चा सुरू होते
घरच्यांशी बऱ्याचदा, खोट बोलू लागतात
प्रेमात पडले की सारेच कविता करू लागतात

टपरीवरचा चहा सुद्धा, तिच्यासंगे गोड लागतो
हॉटेलात जेवणाचं बिल, तोच भरू लागतो
इतरांशी कधी कधी, वेड्या सारखेच वागतात
प्रेमात पडले की सारेच, कविता करू लागतात

एकदिवस घरच्यांना, अचानक प्रेमकहाणी कळते
हा हा ना ना करतांना, दोघांचीही बोबडी वळते
घरच्यांचा होकार मिळताच, आनंदाने नाचू लागतात
प्रेमात पडले की सारेच, कविता करू लागतात