खास मित्राला : [ मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जे सुचले ते असे हे ...]

  
सलाम तुम्हा दोघांना 
एवढी वर्ष काढलीत 
मस्तपैकी खेळून तुम्ही  
म्याच जिकून दिलीत  
किती होती गर्मी 
नि किती होती थंडी 
संसाराची गाडी तुमची 
सुसाट कशी धावली !!
 
हा आला तो आला 
खूष  झाली सर्व 
खाऊन पिऊन सगळी झाली 
छान पैकी तृप्त ..!!
 
ढग भरले विजा चमकल्या 
तरी तुम्ही शांत 
आम्हालाच कधी कधी  वाटायची 
उगाचच  तुमची भ्रांत
 
सलाम तुम्हा दोघांना 
एवढी वर्ष काढलीत 
मस्त पैकी खेळून 
तुम्ही म्याच  जिंकून दिलीत !!!!