फार पडझड झालीय ह्या शरीराची !!

कितीतरी उन्हाळे पावसाळे उलटून गेले 
शरीराने खूप भोग घेतले भोगून 
सुख दुख घेतले पचवून 
पण आता नाही सहन होत त्याला ह्या ऋतूंचे बहाणे 
नाही सहन होत ह्या शरीराला आता हे बदल 
थकून गेलेत त्याचे  गात्र नि  गात्र 
गंजून गेलेत ह्या सांध्याच्या बिजागर्या
कुरकुरतोय  सांधा नि सांधा 
नेत्र लागलेत पैलतिराला....!!
आतला तो  असतो अजूनही  प्रचंड टवटवीत 
लाथेने  हे जग ठोकरीत 
तेवढी वाटते प्रचंड हीमत 
तो  आहे तितकाच उत्साही .ताजा टवटवीत 
 
मन किती ताजे आहे 
त्याच्यात अजूनही ताकद आहे हे शरीर 
सांभाळण्याची 
पण हे शरीरच गेलेय घाबरून 
त्यानेच  दिलाय धीर सोडून 
हातपाय बसलाय गाळून 
संपून गेलीय सारी उमेद
किती सांभाळून घेणार ह्या रड्या शरीराला ...!!
मात्र ..खरेच...!! 
देवाने जे शरीर दिलेयना ते खूपच झालेय खराब 
किती टिकणार .किती टिकवणार ..??
आता ह्या शरीराचा नाही वाटत भरोसा 
पोरांच्या नजरेत  दिसतात 
त्याला  आपल्या संपल्याच्या खुणा ...!!
  
 
 
 
.