आजचं काय अन उद्याचं काय
काही कराचं न्हाय तर कराचं काय
खेटर तुटलं तरी जागचं हालाचं न्हाय
मांजर आलं आडवं तर म्होरं जायाचं न्हाय
पळतंय जग म्हनून मागं पळाचं न्हाय
गावतंय समदं हितंच मग उगा धावाचं काय
शिक्षान शिक्षान म्हनता त्याचा हुपयोग तो काय
चार बुकं शिकून हातात काय बी न्हाय
सोःताचीच कुऱ्हाड अन सोःताचेच पाय
उगा नसता ताप कुनी सांगितला हाय
कुनाकडं काय बी मागाचं न्हाय
कुनाला काय बी द्यायचं न्हाय
पैका-लत्ता काय बी जमवायाचा न्हाय
कष्ट अन तरास घ्यायचा कशापाय
उगा कुनावर जीव लावाचा न्हाय
फुका कुनासाठी जीव द्याय्चा बी न्हाय
व्हतं तेच जे व्हायाचं हायइ
चार करून डोकं जाळाचं न्हाय
मग आजचं काय अन उद्याचं काय
काही कराचं न्हाय तर कराचं काय