दोष माझे

दोष माझे

ह्यांनी माझे दोष काढले !
त्यांनी माझे दोष काढले !
तुम्ही माझे दोष काढले !
मग
माझे दोष खाली पडले ....... माझ्या मनाला लागलं,
माझे दोष रडू लागले,
रडवेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघू लागले ......
अगदी केविलवाणे ......
शेवटी मी त्यांना उचलून घेतलं .
आणि
संपूर्ण जगाची माफी मागून पुन्हा आपलेसं केलं
त्यांना तरी कोण आहे म्हणा ....ह्या जगात ....माझ्या शिवाय !

 - अनुबंध