रिकामी वेदना
वेदना ही रक्तासारखी
वाहून गेली पाहिजे
एखाद्या ठिणगीसारखी
पेटवून गेली पाहिजे
वेदना ही भरभरून
रडवून गेली पाहिजे
भुकंपाच्या धक्क्यासारखी
हदरवून गेली पाहिजे
इतकी तिव्र असावी की
काळीज पोखरून गेली पाहिजे
तरी लढायची आशा
उरात ठेऊन गेली पाहिजे
वेदना ही पावसासारखी
आली पाहिजे, गेली पाहिजे
परत सुकता येईल असं
भिजवून गेली पाहिजे
जुनं झालेलं सारं काही
घेऊन गेली पाहिजे
आपल्याला नव्याने भरण्यासाठी
रिकामं करून गेली पाहिजे
(काल मावशी म्हणाली मला...
रिकामी वेदना काही कामाची नसते)
-- मयुरेश कुलकर्णी