का विषाला पाहिले चाखून मी.

भावनेला वेगळे मोजून मी;
का विषाला पाहिले चाखून मी.

एकही ना कोपरा आता उरे;
तू असावा, शोधते वाटून मी.

तू दुरावे हे जरी सारे दिले;
आजही जाते तरी जवळून मी.

वादळाचा बाज सारा मोकळा;
आणली तव नाव हाकारून मी.

प्राण माझा घाव तुझा सोसतो;
मोजले ते दुःख गोंजारून मी.

मज हवे ते असत नाही का इथे?
का चालते वाट नाकारून मी?

सांगण्याची लागली हुरहुर मला;
जाणले हे सत्य डोळ्यातून मी.