दिसे न माणुस मन भटके जड
धुक्यात बिंब हरवलेले
जिथे तिथे अस्तित्व सभोवर
दंव पर्णांवर थिजलेले
धुंद पटल भावना अंध
चाचपे लोपलेले अंतर
दिशाहीन सारे अवघे
हरल्यावर कळते हे नंतर
अस्तित्वच हे खरे एकटे
सोंग सोंगटीचे पटभर
भासच बाकी मनरमणास्तव
संमोहन द्वय नयनांवर
नुरेल सरता शेष राखही
चिरंजीव ह्या शब्दसरी
ठसे पावलांचे पुसलेले
कुणास दिसतिल कधीतरी
चारवा