राम्या आन श्याम्या
एका कालेजात हाये
मनून गाडीवर रोज
मिळूनच जाये
ब्यागमंदी भरे
दुनियाभरच सामान
गाडीले केल त्यायन
रस्त्यावरच इमान
शेजारच्या बुड्याले
कटा रोज मारे
बुड्याच डोक कस
गरगर फिरे
एकदिस बुड्यान
पकडलं खर
आन दोघायवर केला
शब्दाचा मार
म्हणे मायबापच्या पैश्यावर
शोकपाणी करता
जीन्स pant t-shirt
चष्मे भी लावता
नवे नवे गोरे गोरे
हिरो वाणी दिसता
वर्गाम्नदी मोटे मोटे
दिवे कन लावता
आजकालचे पोट्टे तुम्ही
भलतेच भारी
बुड्याकड पाहून
डोळा पटकन मारी
मायबापाचे तुमी
नंन्ने मुन्ने बच्चे
थोरांचा आदर करण्या
असे कसे कच्चे
आतातरी जरा
शायन्या सारख वागा
नसन होत शिकन
त ढोर घेऊन मागा
अजब हि दुनिया
आन अजब हो पोर
शायन्यास खरा
शब्दाचा मार