चौपाटीवरची संध्याकाळ ..!!

कशी असते चौपाटीवरची संध्याकाळ ..?
भन्नाट गर्दी असते नि हवाहवासा असतो एकांत 
कोठल्यातरी खिन्न अंधारात प्रेमाची उधळण करीत
अगणीत जोड्या  हरवून जातात  स्वप्नात
तशी जुनीच  ओळख नव्याने शोधत असतात
एकमेकाला बिलगून शरीराची भाषाच बोलतात
कान नि डोळे बंद असतात
त्याना कळत असते फक्त ओठाची भाषा
ते होतात मंत्रमुग्ध
नि घट्ट बिलगून बसतात
 
संध्याकाळचा केशरी काळोखी प्रकाश मिसळत असतो तनामनात
हळूहळू रंगत येत जाते
विसरून जातात स्वताला
,शरीराला... शरीराची नव्याने ओळख होत असते
घे... घे ..! दे,, दे!! ची भाषा लवथवत असते
ब्रम्हाडात काळोख मिसळत असतो 
अमिबासारख्या एकाच्या दोन दोनच्या चार
अशा अगणीत जोड्या जमून जातात
घट्ट बिलगून स्वप्नसुखात
  
एखादा चणेवाला येतो आपली टोपलीतले चणे दाणे विकायला 
गळ्यात बांधलेल्या  टोपलीत मीनमिनता  दिवा  
अंधाराला भोके  पाडीत
उध्वस्त करतो त्यांच्या उधाणाला
एखादे भिक मागणारे पोर संधी साधून
त्यांना हाताने स्पर्शत  मागत राहते आणा पैसा
तो हलत नाही मग
मिठीतल्या मिठीतून ते देऊन टाकतात एखादा पैसा
नि जातात विरघळून मिठीत
विसरून स्वताला ...!!
ह्या जगाला ...!!!
 
कोण कोठे नि कोण कोठे राहतात कुणास ठाऊक...? 
कामाचे असतात   बरेच बहाणे 
कामाचे ,अभ्यासाचे ...!!
ह्यालात्याला भेटण्याचे 
आई-बाप करीत बसतात चिंता 
देवाजवळ दिवा लावून बघतात वाट त्यांच्या येण्याची एवढी कष्ट करतात पोरे 
रात्रीचा दिवस करून जागतात
तरी कशी मागे पडतात अभ्यासात कुणास ठाऊक 
 
मात्र ह्या उधाणलेल्या काळोखात 
समुद्राच्या रेतीवर पोरे हरवून जातात 
उद्याची चिंता विसरून जातात 
जातात प्रणयात हरवून .....