या झाडावर हा कुठला रोग पडलाय...

या झाडावर हा कुठला रोग पडलाय
की हिरमुसून गेलंय सगळं जंगल

मला असं वाटतं की ही जुनी  झाडं
जगली पाहिजेत खूप दीर्घ काळ
डोळ्यांमधले चंद्र दुधाळेपर्यंत
म्हणजे मला कल्पिता येतील
या झाडांसमेत
इतिहासातली पात्रे

आज संध्याकाळपासून
खूप जोराचा वारा वाहतो आहे
आणि मला या भिरभिरणाऱ्या पाचोळ्याकडे पाहून
ढीगभर रडावंसं वाटत आहे.

अनंत ढवळे