प्रेम कथा..

शब्द मूक झाले 
काही बोलण्या आधीच
पाउस पडून गेला
आभाळ येण्या आधीच
सर्व काही होऊन गेले
काही घडण्या आधीच 
डोळ्यांत अश्रू आले
रडण्या आधीच
अशी संपली माझी प्रेम कथा
सुरू होण्या आधीच..