"वृद्धाश्रम, संस्कारवर्ग म्हणजे
बांडगुळे लागली आहेत समाजाला"
एकजण म्हणाला
प्रथमतः समजलेच नाही
कुठेतरी दादही दिली कल्पनेला
मग लक्षात आले,
न विचारता कुणाला
अंगाखाद्यावर वाढते
बांडगुळच म्हणतात त्याला
किती माज ह्या बांडगुळांला
रक्त पिताना पालकाचे
लाजही वाटत नाही त्यांला
झाड कधी धिक्कारत नाही
बांडगुळाला
झाडाने कधीच चाखली नाहीत
स्वकष्टाची फळे
मी, माझे कधी ना म्हंटले
रसाळ संस्कार वाटले जगाला
मुले शोषतात पालकाला
आणि संस्कारवर्गात पाठवतात
अपत्याला
खोटी प्रतिष्ठा, बेगडी प्रेम
फार आयुष्ये नसते ह्या दिमाखाला
तुच्छतेनेच बघते जग
लकाकणाऱ्या बांडगुळाला
संस्कारवर्ग म्हणजेच पालक
अनुभवी वृद्धानी फुलारलेले घर
म्हणजेच वृद्धाश्रम
ना कोपराही लाभतो येथे बांडगुळाला.